आमची ओळख
आम्ही स्थानिक व्यवसायांना डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे एक आधुनिक व्यासपीठ आहोत. आमचे उद्दिष्ट आहे — स्थानिक व्यापारांना ऑनलाइन आणणे, त्यांचा व्यवसाय वाढवणे आणि ग्राहकांना सोयीस्कर खरेदीचा अनुभव देणे.
आजच्या काळात ऑनलाइन खरेदी हे जीवनाचा एक भाग झाले आहे, पण अनेक वेळा ग्राहकांना त्यांच्या परिसरातील विश्वासू दुकानदारांबद्दल माहिती मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही एक अद्ययावत “Customer App” तयार केले आहे. या App द्वारे ग्राहकांना त्यांच्या परिसरातील किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, फूड, ब्युटी, मेडिकल आणि इतर अनेक प्रकारच्या व्यवसायांची माहिती मिळते.
ग्राहक या App मधून थेट खरेदी करू शकतात, सेवांचे बुकिंग करू शकतात, तसेच खरेदीवर Reward Points मिळवून ते पुढील खरेदीत वापरू शकतात.
आमची टीम स्थानिक व्यवसायांना डिजिटल युगात स्पर्धात्मक बनवण्यासाठी सातत्याने काम करते — आम्ही विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक समाधान यावर आधारित सेवा देतो.
स्थानिक व्यवसायांना डिजिटल युगात बळकट करण्यासाठी एक एकत्रित व्यासपीठ निर्माण करणे, जिथे ग्राहकांना जवळच्या दुकानांमधून सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह खरेदी करता येईल.
आमचे स्वप्न आहे — "प्रत्येक खरेदी स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी असावी."
- स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाइन उपस्थिती देऊन त्यांचा व्यवसाय वाढवणे.
- ग्राहकांना जवळच्या दुकानांमधून गुणवत्ता, सुविधा आणि ऑफरचा सर्वोत्तम अनुभव देणे.
- “खरेदी तुमच्याच शेजारी” या संकल्पनेला डिजिटल स्वरूप देऊन समुदाय भावना बळकट करणे.
- पहिल्या वर्षात १०,०००+ स्थानिक विक्रेते आणि हजारो ग्राहकांना जोडणे.
- प्रत्येक शहरात “Local First” ही सवय निर्माण करणे.
- वापरकर्त्यांना सुलभ, जलद आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव देणे.
- विक्रेत्यांना तांत्रिक व मार्केटिंग सहाय्य उपलब्ध करून देणे.
आमची वचनबद्धता
VICSPL ही वास्तविकता आणि नियमांवर विश्वास ठेवून कार्य करणारी कंपनी आहे. आमची त्रिसूत्री आहे:
समान संधी
प्रत्येक ग्राहकास सलग्न दुकानातून काहीही खरेदी करण्याची समान संधी
समान हक्क
प्रत्येकास आपल्या कुवतीनुसार खरेदी करण्याचे संपूर्ण स्वतंत्र
समान न्याय
लहानमोठ्या प्रत्येक खरेदीवर मिळणार समान किमतीचे रिवॉर्ड्स पॉइंट्स
