संकल्पना

प्रकल्पाबद्दल थोडक्यात

संकल्पना

आम्ही तुमच्यासाठी आणली आहे एक अभिनव संकल्पना

एकनिष्ठ ग्राहक पारितोषिक सूट (Customer Loyalty Rewards Points)

ही संकल्पना साकारली आहे Vijayshree Infotech Consultancy Services Pvt. Ltd. (VICSPL) कंपनीने.आपल्या ( saumitra.in ) या Application च्या माध्यमातून.

आमचा प्रामाणिक उद्देश

एकच ध्येय एकच ध्यास स्वतःबरोबर आपल्या सर्वांचा विकास.

व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्या फायद्यासाठी आम्ही विकसित केलेल्या सहज सोप्प्या प्रणालीचा वापर करून आपण सर्वसामान्य ग्राहक ते भावी पिढीतील  उद्योजक घडवण्याचे कार्य एकमेकांच्या सहकार्याने साध्य करुयात.

थोडक्यात सांगायचे तर….

  • स्थानिक व्यापारांना डिजिटल बनवणे: प्रत्येक छोट्या व्यवसायाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणून त्यांचा व्यवसाय विस्तारास मदत करणे.
  • ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये थेट संपर्क: ग्राहकांना स्थानिक विक्रेत्यांशी जोडून विश्वास वाढवणे.
  • एक App – अनेक व्यवसाय: विविध प्रकारचे सर्व व्यवसाय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.
  • Reward System द्वारे ग्राहक निष्ठा वाढवणे: ग्राहकांना खरेदीवर पॉइंट्स देऊन त्यांना परत परत खरेदीसाठी प्रोत्साहित करणे.
  • स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे: प्रत्येक खरेदीतून स्थानिक व्यापाऱ्यांना बळकटी मिळवून देणे.

ग्राहक ते भावी पिढीतील उदयोजक

सामान्य ग्राहकांना बाजारातील व्यापारव्यवस्थेमद्धे होणाऱ्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती देऊन आपण या व्यापार व्यवस्थेचा अविभाज्य व महत्वपूर्ण भाग कसे आहोत. त्याबद्दलची जागरूकता निर्माण करून त्यांना जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने व्यवहार कौशल्य शिकवून जर आपण ग्राहक संघटीत झालो तर प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या व्यापार व्यवस्थेचा एक ग्राहक म्हणून कसा लाभ घेऊ शकतो . त्यासाठी आपल्याला छोटा का होईना पण व्यावसायिक होण्याचे महत्व पटवून देणे . त्यामुळे आपल्याला या व्यापार व्यवस्थेमध्ये लाभ घेता येईल . एकदा आपण व्यवहार कौशल्य व व्यवसायनीती या दोन गोष्टीत पारंगत झालो तर आपल्याला भावी पिढीचे उद्योजक होण्यास कोणत्याही समस्या अडवू शकणार नाही . हेच सर्वसामान्य ग्राहक ते भावी पिढीतील उदयोजक घडवण्याचे काम Vijayshree Infotech Company करणार आहे,

आज व्यवसाय , उद्योगांचा विचार करता तळागाळातील छोटे व्यावसायिक आणि उदयोजक यांना सोबत घेणे हि काळाची गरज आहे नियमित गरज भागवणारे उद्योग जर स्थानिक जनतेकडे असतील तर जनतेची आर्थिक स्थिती मजबूत राहील आज अनेक राज्यांमध्ये स्थानिक जनतेच्या हातात जे व्यवसाय आहेत , त्यामुळेच त्यांचा आर्थिक पाया तेथे भक्कम आहे . ज्यांच्या हातात आर्थिक पाठबळ असते त्या समाजाचा विकास लवकर व अधिकाधिक होतो. त्यामुळेच सर्व सुविधा जसे शिक्षण , कला , क्रीडा , आरोग्य , दळणवळण योग्य रीतीने पुरवता येतात . आपण ग्राहक वर्ग म्हणून एकत्र आल्यास व्यवसाय व्यवस्थेमध्ये प्रचंड ग्राहक क्रांती घडवू शकतो.

ग्राहक, उत्पादक व विक्रेता यांचा एकत्रित उत्कर्ष साधणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपले स्वागत आहे.

Need Help?