आमच्याविषयी
विजयश्री इन्फोटेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. ( सौमित्र )
ही कंपनी उत्पादक, किरकोळ विक्रेते, छोटे उद्योजक, सेवा पुरवठादार आणि आपला खरा राजा म्हणजेच ग्राहक यांना योग्य उत्पादने आणि सेवा मिळवून देण्यासाठी कार्य करते आहे ,
आजकाल ग्राहक नैसर्गिकरीत्या ऑनलाइन खरेदीकडे वळलेला आहे . याचा प्रतिकूल परिणाम ऑफलाईन आणि पारंपरिक व्यवसायांवर होत आहे.
यावर उपाय म्हणून विजयश्री इन्फोटेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन आली आहे. आमची “निष्ठावान ग्राहक टिकवून ठेवण्याची व्यवस्थापन संकल्पना” ( Loyal Customer Retention Management Concept ) ही अशी सदस्यता आहे ज्याचा थेट फायदा आमच्याशी संलग्न ( Affiliated ) असलेल्या विक्रेत्यांना मिळतो.
ग्राहकांना योग्य उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी तसेच त्याना आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी आम्ही मध्यस्थ ( Mediator ) म्हणून सर्व जबाबदारी स्वीकारतो.
एकदा विक्रेते आणि सेवा पुरवठादार आमच्याशी संलग्न झाले की, आम्ही बाजाराचा सखोल अभ्यास करून जाहिरात करणे, सवलती देणे, आकर्षक पॅकेज तयार करणे हे सर्व सशुल्क करतो. विक्रेता आणि सेवा पुरवठादाराने नोंदणी केल्यानंतर आम्ही त्याला युनिक आयडी, पासवर्ड आणि आमचे ( saumitra.in ) हे मोबाईल Application / website उपलब्ध करून देतो. या All Categories Business Listing Website च्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या नित्य गरजा नियमित पणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादने व सेवा यांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक बहुउपयोगी Platform सुनियोजित पद्धतीने ग्राहकांच्या सेवेत सादर केला आहे ,त्यामुळे ग्राहकांना उत्पादन विक्रेते आणि सेवा पूरवठादार यांचे एका पेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतील, ( VICSPL ) कंपनीने सर्व योग्य निकषांचे पालन करणाऱ्या Verified विक्रेते आणि सेवा पुरवठादार यांनाच नोंदणीकृत केलेले आहे ,ज्यामुळे ग्राहक विश्वासाने उत्पादने व सेवांचा वापर करू शकतील याची आम्हाला खात्री आहे ,
ऑफलाईन आणि पारंपरिक दुकानदार, उत्पादक, किरकोळ विक्रेते, छोटे उद्योजक व सेवा पुरवठादार यांना ऑनलाईन बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड द्यायला सक्षम करणे.
आम्ही अशा सेवा पुरवतो ज्यामुळे दरांच्या युद्धाचा ( Price war ) आणि तीव्र स्पर्धेचा त्रास कमी होतो. आमच्या “निष्ठावान ग्राहक टिकवून ठेवण्याच्या संकल्पनेतून” ग्राहक, विक्रेते, उत्पादक इत्यादींना त्यांचे सर्व हक्काचे फायदे मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणे.
- १०,००० पेक्षा जास्त विक्रेते व सेवा पुरवठादार यांना आमच्याशी संलग्न करणे.
- “तुमच्या ग्राहकांना जोडून ठेवणे, तुमचं दुकान चालू ठेवणं आणि तुमचा व्यवसाय वाढवणं – हीच आमची जबाबदारी!”
प्रामाणिकपणा / पारदर्शकता / बांधिलकी / सचोटी / विश्वास / निष्ठा
आमच्या ५ मुख्य वैशिष्ट्ये
“प्रत्येक स्थानिक व्यवसाय डिजिटलदृष्ट्या सक्षम होऊन आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत हातभार लावेल” — हीच आमची प्रेरणा आहे.
- सोपे वापरण्याजोगे इंटरफेस:
व्यापाऱ्यांना कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय त्यांचा व्यवसाय सहजपणे ऍपवर दाखवता येतो. - फोटोसह उत्पादन/सेवा सादरीकरण:
आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची आकर्षक फोटोसह माहिती देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव पाडता येतो. - स्थानिक व्यवसाय नेटवर्किंग:
इतर व्यापाऱ्यांशी जोडले जाऊन परस्पर सहकार्य व वाढीसाठी संधी निर्माण होते. - ग्राहकांपर्यंत थेट पोहोच:
तुमच्या परिसरातील ग्राहकांना तुमच्या व्यवसायापर्यंत सहज पोहचता येईल, ज्यामुळे विक्री वाढते. - सामाजिक बांधिलकी:
आमचे App केवळ व्यवसायवृद्धीपुरते मर्यादित नाही — आम्ही समाजात जागरूकता, उद्योजकता आणि डिजिटल प्रगतीला चालना देतो.
